You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी वाढदिवस अभिष्टचिंतन

सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी वाढदिवस अभिष्टचिंतन

सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा आज वाढदिवस. सावंतवाडीतील वंजारी कुटुंब हे पूर्वीपासून निष्ठावान काँग्रेसवाले. नारायण राणे काँग्रेसमध्ये आले तेव्हा समीर वंजारी व आता जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या त्यांच्या पत्नी सौ.साक्षी वंजारी दाम्पत्य राणे कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे, परंतु राणेंनी काँग्रेस सोडल्यावर मात्र निष्ठावंत वंजारी द्वयीनी मात्र काँग्रेसमध्ये राहणेच पसंत केले. समीर वंजारी हा हाडाचा कार्यकर्ता. मार्केटिंग स्किल असलेल्या समीरने मार्केटिंगमध्ये अवघ्या महाराष्ट्रात आपली छाप पाडली.
नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यावरही निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते म्हणून कॉंग्रेसमध्येच राहिलेल्या सौ.साक्षी वंजारी यांच्यावर पक्षाने जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर समीर वंजारी यांच्याकडे तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचा कारभार सोपवला. तालुका काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून समीर याने आपला मार्केटिंग व्यवसाय सांभाळत पक्ष संघटनेसाठी तन मन धन अर्पून काम केले. कोरोनाच्या महामारीत ते कित्येकांचे आधारवड बनले होते. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्याकडे कोरोना रुग्णांची सेवा जबाबदारी सोपवली होती. रात्री अपरात्री देखील कोणी कोविड रुग्ण अडचणीत असला तर समजताच त्याच्या मदतीसाठी समीर धावून जायचा. रुग्णसेवेसाठी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या माध्यमातुन समीर वंजारी यांनी अनेक रुग्णांना योग्य उपचारासाठी मदत केली.
यावेळी काही काळासाठी तर त्यांनी आपला व्यवसाय देखील बाजूला ठेवला व रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यामुळे अनेक राजकीय नेते हॉस्पिटलमध्ये दिसत नसतानाही समीर दिवस-रात्र रुग्णसेवेत व्यस्त दिसायचा.
कोरोना लसीकरण मोहिमेत सुद्धा समीर वंजारी यांनी उल्लेखनीय कार्य करून लोकांना लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लोकांसाठी केवळ काम करत राहायचं, प्रसिद्धीचा कोणताही हव्यास नाही, समोर येणाऱ्याला मानाने दादा, काका अशी हाक द्यायची. अशा या काँग्रेस धार्जिण्या वंजारी कुटुंबातील काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने करत पदासाठी नव्हे तर पद लोकांसाठी वापरले. अशा या लोकांच्या मनातील कार्यकर्त्याचा आज वाढदिवस. संवाद मिडियाकडून कट्टर काँग्रेस कार्यकर्ता समीर वंजारी याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − two =