You are currently viewing कारिवडेतील युवकाने ओटवणेत आत्महत्या केल्याचा संशय

कारिवडेतील युवकाने ओटवणेत आत्महत्या केल्याचा संशय

पुलानजिक उभ्या गाडीत सापडली सुसाईड नोट

ओटवणे

ओटवणे नदीवरील पुलानजिक फोर व्हिलर गाडी उभी करुन युवकाने आत्महत्या केल्याचा संशय असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. उभ्या केलेल्या या गाडीत सुसाईड नोट प्राप्त झाली आहे.
सदरचा युवक हा चौकुळ येथील असून सध्या कारिवडे भैरववाडी येथील स्थायिक असल्याचे सांगण्यात येत आहे. कालपासून सदर युवक गायब होता. मात्र, अद्याप हा युवक सापडला नसल्याने शोधाशोध सुरु होती. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल होत दरवाजा उघडला असता ही सुसाईड नोट आढळून आली. सदर युवक विवाहित असून सावंतवाडी आयसीआयसी बँकेचा कर्म चारी असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =