You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बांदा, इन्सुलीसाठी सायरन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बांदा, इन्सुलीसाठी सायरन

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार : तीन सार्वजनिक मंडळांकडे भोंगा सुपूर्द

बांदा

पूरस्थितीच्या धोक्याबाबत तेरेखोल नदीपात्रालगतच्या नागरिकांना आगाऊ सुचना मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील तीन सार्वजनिक मंडळांकडे सायरन (भोंगे) सुपूर्द करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडे सायरन देण्यात आले.

बांदा येथील साई भक्त मंडळ, कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ बांदा, इन्सुलीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाकडे हे सायरन देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अमित सामंत यांनी केलेल्या कार्याच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कौतुक केले. यावेळी बांदा, इन्सुलीवासियांनी त्यांचे आभार मानले. तर गावासाठी केलेल्या मदतीबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, जिल्हा उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, राष्ट्रवादी युवा नेते असलम खतिब, बांदा ग्रामस्थ राकेश केसरकर, प्रितम हरमलकर, साईराज साळगावकर, राजेश विरनोडकर, रवींद्र मालवणकर, सुशांत पांगम, सुनील धामापूरकर, इन्सुलीचे श्री. पेडणेकर, श्री. शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर, श्री. नाईक, अर्चना पांगम, दर्शना केसरकर, संजय पालव, चेतन वेंगुर्लेकर, संजय भाईप, राकेश परब आदींसह बांदा, इन्सुली येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अन्वर खान तर आभार अक्रम खान यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा