You are currently viewing जनता कर्फ्यु स्वयंफुर्तीने यशस्वी करा : समीर नलावडे

जनता कर्फ्यु स्वयंफुर्तीने यशस्वी करा : समीर नलावडे

कणकवली :
कणकवली शहरात कोरोना व्हायरस ची पसरत असलेली साखळी रोखण्यासाठी रविवार 20 सप्टेंबर पासून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वानुमते पाळण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिक व्यापारी व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढ होत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणारयांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. दिवसेंदिवस शहरात पॉझिटिव्ह मिळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जनतेच्या सहकार्यातून हा जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात कोरोनाची शहरात पसरताच असलेले साखळी रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल यशस्वी करण्यासाठी सर्वांची साथ गरजेची आहे. यात कणकवलीतील व्यापारी जनता स्वयंसेवी संस्था व संघटना यांनी सहभागी होऊन आज पासून होणारा जनता कर्फ्यू यशस्वी करावा. कणकवली शहरातील जनतेने आतापर्यंत वेळोवेळी नगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. नगरपंचायत नेहमीच शहरातील जनता व व्यापाऱ्यां सोबत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी आतापर्यंत दिलेले केलेले सहकार्य असेच पुढे ठेवत 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू यशस्वी करावा अस आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =