You are currently viewing व्यावसायिक अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परिक्षा 20 ते 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन

व्यावसायिक अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परिक्षा 20 ते 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन

सिंधुदुर्गनगरी

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा सोमवार दि. 20 ते 24 सप्टेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

            जिल्ह्यात ही परीक्षा एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली  या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, या परीक्षेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 138 इतकी आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − thirteen =