You are currently viewing बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा…

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा…

वेंगुर्ले

5 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त बॅरी. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस स्टाफ सेक्रेटरी प्रा.देविदास आरोलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम चेअरमन वामन गावडे, डॉ. व्ही एम पाटोळे, बी बी जाधव, पी जी देसाई, पी एम देसाई, आर डी सूर्यवंशी, गणेश मेहेत्रे, राजकुमार हराळे, क्रीडा शिक्षक हेमंत गावडे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा