You are currently viewing बांदेकर माय लेकरांचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सुयश.

बांदेकर माय लेकरांचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सुयश.

शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड, कोल्हापूर आयोजित, राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत, बांदा येथील केंद्र शाळा नंबर 1 मध्ये ,इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने कथाकथन स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यात तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आणि याच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नीलची आई सौ.गौरी नितीन बांदेकर यांनी मोठ्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला .या यशात नीलचे वडील नितीन बांदेकर आणि आजोबा श्री. यु.टी सावंत सर यांचे त्यांना अनमोल असे मार्गदर्शन लाभले .
या माय लेकरांनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या यशाबद्दल या माय लेकरांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 10 =