जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य दीपक पटेकर यांची अष्टाक्षरी काव्यरचना
माझं माहेर हे दूर
मन पोचते क्षणात
ओढ माहेराची लागे
उत्साह कणाकणात.
आई-बाप वाट पाही
गाय गोठ्यात हंबरे
लेक येता स्वागतास
सजतील ते उंबरे
प्राण डोळ्यात आणूनी
ध्यान वाटेकडे लागले
प्रिय बहीण भावास
अश्रू नयनी गोठले
सखी होऊनी वहिणी
मन मोकळे ती करी
नणंदेसाठी वेगळी
असे जागा तिच्या उरी
भाचा भाची सर्वांसाठी
आत्या मायेचा सागर
नसे राग द्वेष मनी
आत्या प्रेमाचा आगर
येता माहेरा सामोरी
येती जुन्या आठवणी
प्रश्न मनालाच करी
का केलीस पाठवणी.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६