सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत यांचा इशारा
कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनैतिक व्यवसाय बंद करावेत, अन्यथा आम्हाला उध्वस्त करावे लागतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी दिला आहे.
गोव बनावटीची दारू, ड्रग, मटका, गुटखा विक्री करणारी प्रत्येक तालुक्यात रॅकेट तयार झालेली आहेत, या गोष्टीला पोलीस दल, अबकारी खाते, अन्नभेसळ खाते जबाबदार आहेत. येत्या पंधरा दिवसात हे बंद करावेत अन्यथा जिल्ह्यातील युवकांना बोलावून टीम करून धाडी टाकून हे सर्व आम्ही बंद करणार, घटनास्थळी पोलिस व अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून केस दाखल करायला भाग पाडले जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अबकारी खात्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे महेंद्र सावंत यांनी स्पष्ट केले.