जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य ज्येष्ठ कवी लेखक श्रीनिवास गडकरी यांची काव्यरचना
काल पुष्कळ होता
आज उरला नाही
लपंडाव ऊन पावसाचा
आयुष्यभर सरला नाही .
संधीचे ढग आले
मुसळधार पाऊस झाला
मधेच ऊन पडून
भरलेला वाहून गेला .
विजांचा भयंकार लखलखाट
मेघांचा कंपित गडगडाट
लपंडावाचा पुढचा भाग
तेजस्वी सूर्याचा थाटमाट
उन्हा मागून पाऊस
लपंडाव माहीत होता
पुस्तकांचा गुरु , सखा
सोबतीला आधार होता
वादळवाट तोलून धरली
प्रलयाला बिचकलो नाही
हिमतिने छप्पर बांधले
आश्रयाला गेलो नाही .
बाबा , गुरु , माता
वाट नकोच होती
संकटावर मात करायची
मनगटात हिंमत होती .
श्रावणआता सरून गेलाय
कोवळे ऊन पडले आहे
तुझा हात हातात घेण्यात
स्वर्गसुख दडले आहे .
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण
09130861304