You are currently viewing प्रेम गुलाब

प्रेम गुलाब

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित (व्हॅलेंटाईन विक निमित्त) अप्रतिम काव्यरचना*

*🌹प्रेम गुलाब* 🌹

कसं जमतं रे गुलाबा
काट्यामध्ये फुलायला
वेदनांच्या सोशीत कळा
कोण शिकवी जगायला

कसं जमतं रे तुला
सुंदरीच्या कुंतली हसायला
प्रेम प्रतिक राजस तू
चांदणे श्वासात भरायला

राघू मैनेच्या सोबतीला
प्रेमरंगात तू डुंबायला
दुराव्याच्या भर उन्हात
कधी लागतो सुकायला

रंगछटांचे रूप आगळे
सुगंधाची उसळते लाट
मानसन्मानी तूच सदा
राजेशाही तुझा थाट

पुष्पराज किताबी तू
मना मनात रे ओढ
देखण्या सौंदर्याची अदा
जगी नसे तुला तोड

दुःख लपवून उरात
राज प्रितीचे खोलतो
सृष्टीच्या चमचम पदरावर
दिलखुलास हासतो

उषेच्या सुखद गारव्यात
पाकळ्यांचे पसरी पंख
परोपकारी जन्म तुझा
सोशितो काट्यांचे डंख….

रचयिती…..
सौ.पुष्पा सदाकाळ भोसरी..पुणे
९०११६५९७४७

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा