*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचच्या अमेरिका येथील सदस्या अरुणा मुल्हेरकर यांची काव्यरचना*
गळुनी गेली सारी पाने
वृक्ष उभा ताठ
शिशीर संपता वसंत येतो
पुन्हा दिमाखात……
बहर संपला
वादळ आले
तरूवर सारे
उन्मळून पडले……
सोबतीस एकाकी जीवन
लेकुरवाळी मुले
इद्रधनूचे सप्तरंग जणू
अंगण आनंदाने फुले…..
उदास स्वर ते मारव्याचे
परि वसंतात राग बहार
सुख दुःखाच्या झुल्यावरती
मिळे जगण्याला आधार…..
खेळ संपला जुना
चालणे नवीन वाटेवरी
अखेरच्या श्वासापर्यंत
जगायचे भूवरी…..
अरूणा मुल्हेरकर
अमेरिका