You are currently viewing आयुष्याचं गणित

आयुष्याचं गणित

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य जेष्ठ कवी रामदास अण्णा यांची काव्यरचना*

कठीण जाते समजायला
जीवनाचं कोडं
पण आता कळायला
लागलं थोडं थोडं।।

पंचतत्वात लीन
होईल जेंव्हा काया
कुणी नसे कुणाचे
सारी व्यर्थ माया।।

जिवन आणि मृत्यूत
कमी असते अंतर
उशीर झाला खूप की
कळते सारं नंतर।।

काय चूक झाली माझी
माझ्या येईल लक्षात
जेंव्हा यामराजाचं
दर्शन होइल साक्षात।।

ईर्षा आणि स्वार्थापाई
मनामध्ये जळत होतो
पोटाच्या भुकेसाठी
दिवस रात्र पळत होतो।

मग कळल की खरंच
खुप काही चुकलं
सोपं होतं गणित पण
उत्तर मात्र चुकलं।।

झाल्या होत्या चुका त्या
पुन्हा पुन्हा करील का?
सुधारायची संधी मला
देव एक देईल का?।।

रामदास आण्णा
गाव:मासरूळ ता. जि. बुलढाणा
7988786373

प्रतिक्रिया व्यक्त करा