सावंतवाडी शहरालगतच्या माझाच गावातील प्रकार
जिल्ह्यात गेल्या जवळपास सहा महिन्यांतून अधिक काळापासून कोरोनावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. लसींचा तुटवडा भासत असल्याने तसेच ऑनलाईन लस बुकिंगमध्ये होणारा घोळ, मोबाईल इंटरनेटचा उडणारा बोजवारा यामुळे जिल्ह्यात अजूनही कित्येक नागरिक पहिल्या लसीकरण पासून वंचित आहेत. जिल्ह्यात येत असलेल्या सध्याच्या लसी ह्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन बुक करता येत आहेत, पहिला डोस बऱ्याचदा बुकिंग होत नाही. कॉविन अँप वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनही लस बुक होत नाही. सर्वांकडे अँड्रॉइड फोन नसल्याने देखील वयस्कर लोकांना ऑनलाईन बुकिंग करताना गोंधळ उडतो. काहीवेळा ऑफलाईन पद्धतीने लसीकरण केंद्रावर नंबर लावतात परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं परंतु बुकिंग न झालेलं नसतानाही गेले सहा महिने लसीकरण मोहिमेत भाग घेऊनही योग्य ती माहिती कर्मचाऱ्यांनाच नसल्याने काही नागरिकांना लस उपलब्ध असताना आणि नंबर लावून देखील लसीकरणापासून वंचित रहावे लागते.
असाच प्रकार शनिवारी सावंतवाडी शहराजवळच्या माझाच गाव म्हणणाऱ्या एका गावात घडला. सावंतवाडी शहरातील दोन महिला माझाच गाव येथील लसीकरण केंद्रात ऑफलाईन पद्धतीने नंबर लावून लस घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यापैकी एक महिला ही वयस्कर होती. ऑनलाईन पद्धतीने त्या दोघींचे नंबर रजिस्टर होते, परंतु ऑनलाईन लस बुकिंग झाले नव्हते असे असताना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे लसीचे केंद्रात आधारकार्ड नुसार रजिस्ट्रेशन होत नाही, त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन न होता लस देता येणार नाही, असे सांगून आधारकार्ड व्यतिरिक्त दुसरा आयडी प्रूफ घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना सावंतवाडीत त्यांच्या घरी पुन्हा येऊन इतर आयडी प्रूफ न्यावे लागले परंतु त्यावरही लसीचे रजिस्ट्रेशन झाले नाही. केवळ फोन नंबर दुसरा टाकल्यावर रजिस्ट्रेशन होऊन त्यांना लस देता आली. अशाचप्रकारे अजून काही व्यक्ती अशाच प्रॉब्लेम मुळे माघारी गेल्या होत्या, त्यांना लस दिली की नाही हे समजू शकले नाही.
लसीकरण केंद्रावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना “तुमच्यामुळे असे गोंधळ होतात आणि आम्हाला त्रास होतो” असे म्हणून स्वतःच्या अज्ञानाचे खापर लसिकरणासाठी येणाऱ्या लोकांवर न फोडता आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल परंतु बुकिंग नसेल तर त्या व्यक्तीला ऑफलाईन लस देताना त्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा रिफरेन्स नंबर टाकून, रजिस्टर मोबाईल नंबर बदलून अथवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन रद्द करून ऑफलाईन लस देता येते, याची खात्री केली पाहिजे. अन्यथा वरिष्ठांकडून मार्गदर्शन, आणि मोबाईल अथवा कॉम्प्युटर बाबतचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सगळे पर्याय मोकळे असताना सर्वसामान्य लोकांवर आपल्या अज्ञानाचे खापर फोडणे योग्य नव्हे. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे दोन वेळा लसिकरणासाठी जावे लागल्याने सावंतवाडीतील त्या वयस्कर महिलेने कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत संताप व्यक्त केला आहे.