You are currently viewing भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या कणकवलीत…

भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या कणकवलीत…

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह संचयनी घोटाळ्या प्रश्नी करणार पाठपुरावा

कणकवली

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या उद्या सिंधुदुर्ग मध्ये येत आहेत. यात कणकवलीत ते पत्रकार परिषद घेणार असून परिवहन मंत्री अनिल परब यांचा घोटाळा व संचयनी इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवर आज दिली.
किरीट सोमय्या यांनी नुकताच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दापोलीतील अनाधिकृत रिसॉर्ट प्रकरणी धक्का दिला होता. आता त्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाकडे वळवला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांना रडारवर घेणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे उद्या 3 सप्टेंबर रोजी कणकवली मध्ये येत आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात कणकवली मध्ये येत असल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे .परिवहन मंत्री अनिल परब यांचा घोटाळा व संचयनी इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी पाठपुराव्यासाठी मी उद्या सिंधुदुर्गात कणकवलीत जात आहे. असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता या प्रकरणी काय भूमिका मांडतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा