You are currently viewing प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी घेतली माजी सैनिक कै. भागोजी(मामा) वरक कुटुंबियांची भेट

प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी घेतली माजी सैनिक कै. भागोजी(मामा) वरक कुटुंबियांची भेट

कुडाळ

6 ऑगस्ट 2021 रोजी कुडाळ तालुक्यातील गोठोस गावचे रहिवासी माजी सैनिक कै.भागोजी वरक यांचे राहत्या घरी निधन झाले होते. भागोजी वरक हे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब वरक यांचे काका होत. कै.भागोजी वरक यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे व कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी 26 ऑगस्ट 2021 रोजी वरक यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमोल जंगले, उपाध्यक्ष नवनाथ झोरे, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे युवक आघाडी अध्यक्ष दिपक खरात, कुडाळ तालुका अध्यक्ष बापूसाहेब वरक, मालवण तालुका अध्यक्ष मंगेश झोरे, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ झोरे, जिल्हा प्रमुख संघटक निकेश झोरे, अर्जुन चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा