You are currently viewing …तर! विद्यार्थी व पालकांसह रस्त्यावर उतरण्याचा शिक्षक भारतीचा निर्वाणीचा इशारा..

…तर! विद्यार्थी व पालकांसह रस्त्यावर उतरण्याचा शिक्षक भारतीचा निर्वाणीचा इशारा..

ओरोस येथील बेमुदत साखळी उपोषण आठवा दिवसही चर्चेवीना

तळेरे

गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असलेल्या शाळा प्रशासनाने सुरू कराव्यात, शिक्षकांना अध्यापन कार्याला वेळ द्यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस होता.आज पर्यंत आठही तालुक्यातील माध्यमिक शिक्षक या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी लढा देत आहेत. आज दोडामार्ग तालुक्यातील शिक्षक भारतीच्या माध्यमिक शिक्षकांनी दिवसभर आंदोलन छेडले.

यामध्ये तालुकाध्यक्ष शरद देसाई, युवराज सावंत, कृष्णा नाईक,अनिल ओतारी, प्रेमनाथ गवस, प्रशांत राऊळ,संजय तायवाडे ,अरूण गवस, उत्तम भागीत, व दत्तात्रय काटकर आदीचा समावेश होता.
.…तर आम्हाला विद्यार्थी व पालकांसह रस्त्यावर उतरवे लागेल-:
संजय वेतुरेकर
शाळा सुरू करण्यासाठी सलग आठ दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने अद्याप दखल घेतली जात नसेल तर आम्हाला यापुढेही
शिक्षक भारती विद्यार्थी व पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा देत राज्य संघटना तुमच्या पाठीशी असल्याचेही ग्वाही दिली.


जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव सुरेश चौकेकर,राज्य प्रतिनिधी सी.डी. चव्हाण, संघटक समीर परब, उपाध्यक्ष जनार्दन शेळके, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,मुख्याध्यापक दीपक कांबळे,डीसीपीएस जिल्हा अध्यक्ष गिरीश गोसावी, रत्नागिरी जिल्हा शिक्षक भारतीचे कार्यवाहक निलेश कुंभार जिल्हा सहकार्य संजय पाथरे तसेच देवगड अध्यक्ष हेमंत सावंत आनंद राठ्ये, दिपक कुंवर,आनंदा जाधव, गुरूनाथ कुडाळकर,जर्नादन जंगले आंदीनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
यशस्वी तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन तिव्रपणे असेच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रशा़ंत आडेलकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा