You are currently viewing कुडाळ तालुक्यात काँग्रेस फ्रंट पदाधिकारी यांची निवड

कुडाळ तालुक्यात काँग्रेस फ्रंट पदाधिकारी यांची निवड

कुडाळ

कुडाळ तालुका काँग्रेसच्या मासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील सर्व फ्रंटल अध्यक्ष नेमण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश बाळासाहेब गावडे यांनी दिले होते. त्याप्रमाणे अभय शिरसाट कुडाळ तालुका प्रभारी यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार कुडाळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून तरबेज शेख व कुडाळ शहराध्यक्षपदी तौसिफ शेख यांची नियुक्ती जाहीर केली.

यावेळी अभय शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या विचार व ध्येयधोरणे गावागावात पोहोचवून जो काँग्रेस पासून लांब गेलेला वर्ग आहे त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करूया. पुन्हा कॉंग्रेसला उभारी देणे देण्याचे काम सर्वांनी एकत्रित मिळून करूया, असे सांगितले.

यावेळी तबरेज शेख व तौसिफ शेख यांनी आम्ही काँग्रेस पासून लांब गेलेला अल्पसंख्यांक मतदारांना एकत्रित काँग्रेसच्या विचारधारेशी एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. याप्रसंगी विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, प्रसाद बांदेकर जिल्हा बँक अध्यक्ष, मंदार शिरसाट कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, महेश परब शहराध्यक्ष उरोज चिन्मय बांदेकर, युवक शहराध्यक्ष वैभव आजगावकर युवक व मुनंकर तेंडोली तबरेज शेख ,शाहिद शेख, मुंकदिर शेख, सरफराज खान, अश्रफ मुजावर, मुनीर मुजावर, सुहेल शेख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा