You are currently viewing दहीकाला

दहीकाला

जागतिक “सा क व्य” विकास मंचचे जन संपर्क अधिकारी कवी विलास कुलकर्णी यांची गोकूळअष्टमी सणाचे सुंदर वर्णन करणारी काव्यरचना

अष्टमी आली वाजतगाजत
श्रावण नसानसात भिनला
हृदयी जागा वसंत फुलवीत
सप्तरंगात रंगला दहीकाला

देह निळाई रंग ही वेगळा
बांधून निळ्या गगनी दोर
सभोवती या गोपगोपिका
मधोमध एक बांधून घागर

अमृतासम असते घट्ट दही
त्यात सुदाम्याचे पोहे साधे
चणे फुटाणे डाळिंब दाणे
कान्हा खाई जे आवडे राधे

उत्सवात हर्ष उल्हास भारी
फुलून बहरते सगळे अंगण
बाळ गोपाळ फोडती हंडी
मोहना मुखी काला अर्पण

गोपी गवळणी रचती मनोरे
तयार होते मग सुंदर द्रोण
कोसळता मनोरा झेलण्यास
मित्र बनून आला मनमोहन

कवी विलास कुलकर्णी
मीरा रोड

प्रतिक्रिया व्यक्त करा