कुडाळ मधील अनंत मुक्ताई मंगल कार्यालय येथे आज कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन अध्यक्ष बाळा गावडे यांनी भूषविले. तसेच कुडाळ तालुका निरीक्षक अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सन्माननीय बाळा गावडे यांची अध्यक्ष म्हणून कायमस्वरूपी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाश जैतापकर व उल्हास शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष आबा मुंज आजारी असल्यामुळे कुडाळ तालुका काँग्रेसची जबाबदारी अभय शिरसाट यांच्याकडे सोपविण्यात आली.
तसेच गावात फिरून बूथ कमिट्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष नेमण्यास संदर्भात कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे ठरविण्यात आले. तसेच तालुक्याचे वतीने अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांना भेटून तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच विकास कामासाठी देण्यात येणारा निधी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात यावा असे ठरविण्यात आले.
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यालय कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी चर्चा झाली व जागा निश्चिती करण्यात आली. कुडाळ तालुका एन.एस.यू.आय. अध्यक्षपदी मुळदेकर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चिराग मुंज यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला प्रकाश जैतापकर, उल्हास शिरसाट, प्रसाद बांदेकर, अभय शिरसाट, विजय प्रभू, सदासेन सावंत, चंद्रशेखर जोशी, वैभव आजगावकर, संतोष मुंज, मंदार शिरसाट, चिन्मय बांदेकर, तबरेज शेख, ताऊसिफ शेख, महिला तालुका अध्यक्ष सुंदरवल्ली स्वामी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले.