You are currently viewing इंडोनेशियात मास्क न घातल्यास अजब शिक्षा

इंडोनेशियात मास्क न घातल्यास अजब शिक्षा

वृत्त सार :

जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळामध्ये वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच जगातील वेगवेगळ्या देशांमधील सरकारमार्फत मास्क घालूनच घराबाहेर पडा, सोशल डिस्टंन्सिंग पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र लाखो लोकांचा बळी घेणा-या करोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात लोकांना फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. इंडोनेशियामध्येही अशाच काही बेजबाबदार लोकांना शासन करण्यासाठी आगळ्यावेगळ्या शिक्षेची घोषणा करण्यात आली आहे.

येथील पूर्ण जावा प्रांतातील प्रशासनाने मास्क न घालणा-या लोकांना शिक्षा म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कबर खोदण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व जावामधील गेसरिक रीजेन्सी येथील आठ लोकांनी मास्क घालण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शेजारच्या नॉबबेटन गावातील एका सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये कबरी खोदण्याची शिक्षा देण्यात आल्याचे स्थानिक वेबसाईटने म्हटले आहे.

कोर्म जिल्ह्यातील प्रमुख स्यूनो यांनी यासंदर्भात माहिती देताना आम्हाला सध्या कबरी खोदणा-या लोकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच नियम मोडणा-यांना आम्ही या कामाला लावले आहे. या शिक्षेमुळे लोकं सुधारतील आणि मास्क घालू लागतील, अशी आशाही स्यूनो यांनी व्यक्त केली आहे. या पूर्वी राजधानी जकार्तामध्ये मास्क न घालणा-यांना शवपेटीमध्ये झोपण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा