बांदा
येथील इंडेन गॅस एजन्सीतर्फे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात येत आहेत. बांदा येथील १५ लाभार्थींना या गॅस कनेक्शनचे वितरण ग्रामपंचायत कार्यालयात नुकतेच करण्यात आले.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य किशोरी बांदेकर, माजी सरपंच बाळा अकेरकर, इंडेन गॅस एजन्सीचे व्यवस्थापक प्रवीण नार्वेकर, भाजपा महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित आदी उपस्थित होते.