You are currently viewing पणदूर प्रशालेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पणदूर प्रशालेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पणदूर :

आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
“शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर क. महाविद्यालय पणदूरतिठा” प्रशालेत “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” संपन्न झाला.

इयत्ता बारावी एच एस एस सी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखामधून गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रशालेचे माजी विद्यार्थी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मान. श्री नागेंद्र परब व कुडाळ पंचायत समिती उपसभापती मान. जयभारत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्था चेअरमन मान. श्री शशिकांत अणावकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

त्याचप्रमाणे एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. एन एम एम एस परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. पी एम राठोड मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माननीय नागेंद्र परब यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून अभ्यास करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. कोरोणाच्या कठीण काळातही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अतिशय अभिमानास्पद असल्याचे यावेळी नागेंद्र परब यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात माननीय जयभारत पालव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन शशिकांत अणावकर सर यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या या सर्व शैक्षणिक सुविधा यांची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व असेच यश पुढील काळामध्ये संपादन करावे अशी भावना सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने कुमार मोहीन परब व कुमार विघ्नेश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था, शाळा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

प्रास्ताविक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री. मिलिंद कर्पे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक संजय गावकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तर या कार्यक्रमात प्रशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seven =