You are currently viewing फोंडा तलाठी अर्जुन पंडित यांचा गौरव

फोंडा तलाठी अर्जुन पंडित यांचा गौरव

कणकवली विभागात उत्कृष्ट तलाठी म्हणून महसूलदिनी सन्मानित

कणकवली

महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टं प्रमाणे उत्कृष्ट काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल फोंडाघाट चे तलाठी अर्जुन सखाराम पंडित यांचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनी गौरव करण्यात आला. कणकवली विभागांमधील कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्‍यामधून उत्कृष्ट तलाठी पुरस्कार अर्जुन पंडित यांना प्रदान करण्यात आला.

सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावचे सुपुत्र असलेले अर्जुन पंडित यांनी 1986 मध्ये सावंतवाडी तहसील कार्यालयात विनावेतन उमेदवार म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर 2006 मध्ये त्यांना मालवण तालुक्यातील मसुरे, मर्ढे तलाठी पदी नियुक्ती देण्यात आली. तेथून 2013 मध्ये कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावात त्यांनी तलाठी म्हणून चांगली कामगिरी बजावली. 2919 पासून ते फोंडा गावचे तलाठी म्हणून ते कार्यरत आहेत. तलाठी म्हणून कार्यरत असताना फोंडा गावामध्ये महसूल विभागाच्या विविध योजना सक्षमपणे राबवितानाच कोरोना कालावधीमध्ये तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी नागरिकांशी संपर्कात राहत उपाययोजनांमध्ये दाखविलेल्या दक्षतेची दखल घेत अर्जुन पंडित यांचा उत्कृष्ट तलाठी म्हणून गौरव करण्यात आला.

सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी रोहिनी रजपुत, प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा