You are currently viewing छत्रपती सेवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

छत्रपती सेवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

सावंतवाडी

छत्रपती सेवा प्रतिष्ठान माणगाव आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीची पाचवीची विद्यार्थिनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडाळ हायस्कुलची शमिका सचिन चिपकर हिचा द्वितीय तर हळदीचे नेरूर केंद्रशाळेची वेदांगी प्रवीण कविटकर हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे.

मावळ्यांच्या शौर्य कथा हा या स्पर्धेसाठी विषय होता. 8 ते 10 मिनिटात स्पर्धेकांनी ही शौर्य कथा सादर केली. बुधवारी सकाळी छत्रपती सेवा प्रतिष्ठान माणगावने निकाल जाहीर केला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 66 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा