You are currently viewing मनसेचा जिल्हा मुख्यालयावर मोर्चा

मनसेचा जिल्हा मुख्यालयावर मोर्चा

*मायनिंगला पाठीशी घालणारा अधिकाऱ्यांवर कारवाई करा*

ओरोस :

जिल्ह्यातील मायनिंग तसेच सिलिका प्रकल्प वृक्षतोड आधी पर्यावरणाचा अभ्यास करणारे प्रकल्प व सर्वांना पाठीशी घालणारे जबाबदार अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी होऊन तात्काळ कार्यवाही व्हावी. या मागणीसाठी मनसेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी आ.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.

याबाबत दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. तालुकास्तरावरही मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत काही वेळाने समज देऊन सोडून दिले.

सिंधुदुर्गनगरी सिडको कार्यालय परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार असा मोर्चा निघाला यावेळी प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पूर्ण मुख्यालय परिसर मनसे कार्यकर्त्याने दणाणून सोडला.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येताच पोलिसांनी अडवत शिष्टमंडळाला निवेदन देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले.

अलीकडील काळात उद्भवलेले महापौर सदृश्य परिस्थिती त्यात झालेले वित्त व जीवित हानी यामुळे ओढवलेल्या कळणे मायनिंग परिसरात उडवलेले आपत्ती तसेच जमीन महसूल आणि नीवाड्यांमधील जनतेच्या तक्रारी या सर्वाला तत्कालीन खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. शिवाय करोडो रुपयांचा महसूल बुडित करून वैयक्तिक हितसंबंध जोपासले शासनाचे नुकसान करणे असेही प्रकार महसूल विभागातील जबाबदारी अधिकाऱ्यांकडून घडत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा