नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याने तुफान राडा झाला. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समोरासमोर आल्यानंतर युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीजार्ज केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाला आहे.
