You are currently viewing आचऱ्यात जनआशीर्वाद यात्रेच्या स्टेजचा शुभारंभ

आचऱ्यात जनआशीर्वाद यात्रेच्या स्टेजचा शुभारंभ

मालवण :

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा २६ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. आचरा येथून ही यात्रा तालुक्यात दाखल होत असून आचरा येथील यात्रेच्या स्टेजचा शुभारंभ सोमवारी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कऱण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, उपसभापती राजु परुळेकर, जेरोन फर्नांडिस, संतोष कोदे, आचरा सरपंच प्रणया टेमकर, चिंदर उपसरपंच दीपक सूर्वे, महेश मांजरेकर, अशोक बागवे, चंदू सावंत, शेखर कांबळी, दत्ता वराडकर, संजय लोके, मनोज हडकर, सुनील खरात, मंगेश टेमकर, आशिष पाटील, किशोर त्रिंबककर, बाबू बाईत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा