You are currently viewing सकल मराठा समाज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे करणार स्वागत….

सकल मराठा समाज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे करणार स्वागत….

मराठा समाज मागण्यांचेही निवेदन देणार

कणकवली

मराठा समाज नेते तथा केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑगस्टला दौऱ्यावर येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी चौक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. मराठा समाज मागण्यांचे निवेदनही यावेळी ना.नारायण राणे यांना देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.

कणकवली येथील मराठा मंडळ सभागृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताची तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे मनोज रावराणे, सोनू सावंत, महेंद्र सांबरेकर, भाई परब, समीर सावंत, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी, संदीप राणे, महेश सावंत, बबलू सावंत, महेंद्र गांवकर, यांच्यासह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा