*शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा रोखठोक सवाल*
किरीट सोमय्या ज्या भाजप पक्षाचे काम करत आहेत त्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे जे घटनात्मक पदावर आहेत. त्यांचा स्वतःचा जुहू येथील अधिश बंगला पूर्णपणे अनधिकृत आहे. तहसीलदार यांनी तो बंगला पाडण्याच्या राणेंना नोटीस दिल्या आहेत. तसेच अनेक विभागांनी अधीश बंगला पाडण्याच्या नोटीसा दिल्या आहेत.परंतू आपल्या बंगल्याचे बांधकाम पाडण्याचे धाडस नारायण राणे दाखवणार आहेत का? आणि ते बांधकाम पाडण्यासाठी किरीट सोमय्या आवाज उठवणार आहेत का? असा रोखठोक सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आ.वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी एक चांगला पायंडा पाडला आहे. अनावधानाने का होईना एखादी चूक होऊन अनधिकृत बांधकाम झाले तर ते पाडण्याचे धाडस मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः दाखवल आहे. खर तर त्यांना सीआरझेडची कुठलीही नोटीस नव्हती तिथल्या तलाठी किंवा तहसीलदार यांची नोटीस नव्हती. परंतु ते राजकीय क्षेत्रात काम करत आहेत तहसीलदार तलाठी यांच्यावर दबाव येईल त्यांच्यावर आरोप होतील म्हणून नार्वेकर यांनी स्वतःहून जेवढ बांधकाम अनधिकृत आहे ते पडण्याचे धाडस दाखवल.किरीट सोमय्या यांनी सांगितले म्हणून त्यांनी ते बांधकाम पाडलं अस नाही.व
किरीट सोमय्या त्या तोडलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी दापोलीत येणार असतील तर तिथून १०० किलोमीटर पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी यावे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये सुध्दा नारायण राणेंचा अनधिकृत बंगला आहे. कणकवलीत सुद्धा लक्ष्मी मल्टिप्लेक्स थेटर अनधिकृत आहे. अशी अनेक अनधिकृत बांधकामे आहेत.ती आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू ती बांधकामे पाडण्यासाठी त्याच तडफेने ते आवाज उठवतील का?
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदार खासदार यांना त्रास देण्यासाठी किरीट सोमय्या केंद्राच्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांवर आरोप करत आहेत.परंतु भाजपचे अनेक आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांची देखील अनेक अनधिकृत बांधकामे आहेत.त्यावर देखील कारवाई करण्याचे धाडस किरीट सोमय्या दाखवतील का?ज्याप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी आपला अनधिकृत बंगला पाडण्याचे धाडस दाखवले तसे धाडस केंद्रीय मंत्री नारायण राणे सुध्दा दाखवतील का? असा रोखठोक सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.