You are currently viewing कणकवली पं.स.च्या’डेमो हाऊस’चे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार २६ रोजी भूमीपूजन…

कणकवली पं.स.च्या’डेमो हाऊस’चे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार २६ रोजी भूमीपूजन…

माझी शाळा…माझा किल्ला” स्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव

सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून नव्या उपक्रमांची पायाभरणी

कणकवली:

​प्रधानमंत्री आवस योजनेतील घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शक होण्यासाठी ‘डेमो हाऊस’ कणकवली पंचयत समितीच्या आवारात उभारले जाणार आहे.या डेमो हाऊस चे भूमी पूजन शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले जाणार आहे.या भूमी पूजन सोहळ्याला, सभापती मनोज रावराणे यांच्या सह सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थितीत राहणार आहेत.कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.​​
त्यानंतर सकाळी १० वाजता पंचयत समितीच्या पपू भालचंद्र बाबा सभागृहात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून “माझी शाळा…माझा किल्ला” हा उपक्रमात आयोजित केला होता.त्याला सर्वच शाळातून उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या किल्ल्याचे परीक्षण करून विभाग स्थरावर आणि तालुका स्थरावर असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि विजेत्यांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात केले जाणार आहे.या कार्यक्रमात सुद्धा कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली.​​

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − twelve =