कणकवली :
कणकवली मध्ये जनता कर्फ्यू चा निर्णय कालच झाला असताना आता आजूबाजूच्या म्हणजेच जाणवली वागदे कलमठ पाठोपाठ हळवल गावांनीही कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हळवल गावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरूना बाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात आता आठ दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. हळवल गाव हे पूर्णपणे कणकवली बाजारपेठेवर अवलंबून आहे.हळवल गावातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना ची साखळी तोडण्यासाठी ग्रामसंनियंत्रण समितीने 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान आठ दिवस जनता कर्फ्यू पाडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांशी सहकार्य करण्याचे समितीने आवाहन केले आहे.