You are currently viewing रक्षाबंधन

रक्षाबंधन

एक धागा प्रेमाचा आपल्या गोड नात्याचा,
आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा.

बालपणीच्या आठवणी जपल्या मी धाग्यात,
नाजूक तुझ्या हातांनी घट्ट बांधल्या नात्यात,
रेशमी वीण नात्याची करीन प्रयत्न जपण्याचा,
आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा.

मिरवत असतो सदा मी तू बांधलेली राखी,
बहिण भावाचं नातं तरी तूच असतेस सखी.
मनातलं सारं काही मोह तुलाच सांगण्याचा,
आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा.

सर्व सुखं तुझ्यासाठी घेतली माझ्या ओंजळीत.
औंक्षण करता दिव्यांनी देईन तुज ओवाळणीत.
हट्ट तुझे माझ्याकडेच हक्क तुला भांडण्याचा,
आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा.

सासरी तू जाता कमी तुझीच या हृदयी उरे,
वाटते सांगावे तुला सासरचे हे बहाणे पुरे,
निरोप घेता माहेराचा विसर न पडो भावाचा,
आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा.

{दिपी}✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा