You are currently viewing केंद्र सरकारने कांदा निर्यात वरची बंदी तात्काळ उठवावी..!

केंद्र सरकारने कांदा निर्यात वरची बंदी तात्काळ उठवावी..!

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रेवती राणे यांची मागणी..

सिंधुदुर्ग :

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लादण्यात आली आहे .ती तात्काळ उठवावी.महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्या पिकवत असतात. मात्र केंद्र सरकारच्या विरोधी धोरणामुळे याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच कोरोणाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या कांदाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. तसेच गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक आवाहनाला शेतकरी सामना करत असतात पिकवलेल पिक काढी मोलाच्या भावाने विकावे लागत आहे. “शेतकरी टिकला तर शेती पिकेल” या गोष्टीचा विचार करून तातडीने कांदा निर्यात बंदी रद्द करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे, सौ चित्र देसाई ,सौअंकिता देसाई ,गुरु कामत ,संदीप राणे, संजना निर्मल आदी राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 15 =