*काँग्रेस विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर यांनी वेधले बांधकाम विभागाचे लक्ष*
वेंगुर्ले :
नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उघडलेल्या रस्त्यामुळे नेहमीच अपघात होतात. त्यात नागरिकांचा नाहक बळी जातो. त्यात आता तर पावसाळा आहे. आरवली ते शिरोडा या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साठवून दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रेडी विभागीय अध्यक्ष मयुर आरोलकर यांनी केली आहे.
या रस्त्यावरील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दरवेळेस करण्यात येते आणि प्रत्येक वेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवासी वाहने चार चाकी , दुचाकी व इतर वाहनांना व प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन मार्गावरील खड्डे बुजवावीत अशी मागणी मयुर आरोलकर यांनी केली आहे.


