You are currently viewing खासदारांची विमानतळाबाबत तारिख पे तारीख खेळ का?

खासदारांची विमानतळाबाबत तारिख पे तारीख खेळ का?

मनसे माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा सवाल

गेले अनेक महिने जिल्ह्यातील जनता पहातेय की, खा.विनायक राऊत विमानतळ सुरु होण्याबाबत खुपच उत्सुक आहेत. परंतु कोविड काळात लोकाना नीट रोजगार नाही अनेकांच्यावर बिकट परिस्थिती आहे. आणि खासदार रोज उठून तारीख पे तारिख देत आहेत.
विमानतळ सुरु झाल्यास स्थानिकाना किती रोजगार मिळेल हे खासदारानी एकदा जाहिर करावे.
तत्कालीन पालकमंत्री तारीख देऊन थकले. आता तोच खेळ खासदारानी सुरु केलाय.
सध्या जिल्ह्यात रस्त्यांची काय अवस्था आहे? आणी मुळात विमानतळाकडे जाणारे रस्ते तरी सुस्थितीत आहेत का? जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणेश चतुर्थी जवळ आली आहे. त्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती होईल का? की दरवर्षीप्रमाणे यंदाही आमचे बाप्पा खड्ड्यातून च येणार? हे खासदारानी एकदा सांगावे.असे माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारले.

प्रतिक्रिया व्यक्त करा