जागतिक साहित्य कला व व्यक्तिविकास मंच ह्या समूहात विदेशातील अमेरिका साऊथ आफ्रिका कुवैत कतार कॅनडा सिंगापूर व महाराष्ट्र राज्या बाहेरील २२ कवी /कवयित्री सामील आहेत . समुहाच्या ऑनलाईन कविकट्ट्याचा वर्षपूर्ती सोहळा दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी शाहीर अमरशेख पुरस्कार प्राप्त कवी व गीतकार श्री हनुमंत चांदगुडे अध्यक्ष स्थानी होते व येड्यांची जत्रा फेम अभिनेत्री स्नेहा कुळकर्णी सध्या वास्तव्य अमेरिका प्रमुख पाहुण्या म्हणून तर प्रसिद्ध गझलकार श्री शिवाजी काळे,अभिजित काळे, गझलकारा स्नेहल कुळकर्णी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परीचय सह समन्वयक श्री अनिल देशपांडे ह्यांनी करून दिला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागतिक साकव्य समुहाचे प्रमुख श्री पांडुरंग कुळकर्णी ह्यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या साथीमुळे समाजमनात पसरलेल्या नैराश्याचा उल्लेख करीत साहित्यिकही ह्याच समाजाचा एक घटक असल्यामुळे सहाजिकच साहित्य क्षेत्रातही अनेकांचे लिखाण बंद झालं होत असे सांगून कुणाला लिहायला नविन विषय सुचत नव्हते, तर कुणाला विषय सुचले तरी साहित्य निर्मिती होत नव्हती असे सांगितले. कोरोना आजारावर व त्यानंतरच्या टाळेबंदीच्या परीस्थिती वर लिखाण येत होतं, पण ते नकारात्मकच जास्त होतं, ह्या परीस्थितीत समाजमनावर फुंकर घालण्यासाठी, जे सकारात्मक लिखाण साहित्यिकांकडून अपेक्षित होतं ते अपवादात्मक परिस्थितीत येत होते. नेमकं ह्याच काळात साहित्यिक क्षेत्राला गुगल मिट, झुम ह्या सारख्या अँपच्या माध्यमातून आभासी व्यासपिठ उपलब्ध झालं. ह्याच संधीचा फायदा घेत जागतिक साकव्य समुहाचे प्रमुख श्री पांडुरंग कुळकर्णी यांनी ऑनलाइन कवी सम्मेलनाचे आयोजन करण्याचे ठरवले. श्री चिदानंद फाळके, सौ.अलका कुळकर्णी, विलास कुलकर्णी अशा दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक साकव्य समूहाचे पहीलं ऑनलाइन कविसम्मेलन यशस्वीपणे पार पडलं आणि त्यातूनच बीजारोपण झाल पुढील जागतिक साकव्य समुहाच्या ऑनलाइन कविकट्ट्याचं…. दिनांक १५ ऑगस्ट २०२० ला साकव्यचा पहिला ऑनलाइन कविकट्टा आयोजित केला गेला, त्याला जागतिक साकव्य समुहातील कवींनी अक्षरशः उचलून धरले. त्यानंतर ठरलं हा कविकट्टा दर १५ दिवसांनी किमान वर्षभर तरी घ्यायचा .सुरवातीला लक्ष्य अवघड वाटायचं पण कवींकडून मिळणारा प्रतिसाद पहाता वर्ष केंव्हा सरलं कळलच नाही.. सर्वजण ह्या कविकट्ट्याच्या वर्षपुर्ती सोहळ्याला १५ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा एकदा आभासी माध्यमावर हजर झाले.ह्या प्रसंगी आयोजित निमंत्रित कवींच्या कवी सम्मेलनात भारतासह विदेशातून निमंत्रित कवी / कवयित्री आभासी माध्यमावर उपस्थित होते.कवी कट्टयाचे सह समन्वयक श्री दिपक
जोशी व अनिल देशपांडे ह्यांना वर्षभर कवी कट्ट्याचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवीकट्टा सह समन्वयक श्री दिपक जोशी ह्यांनी तर आभार प्रदर्शन साकव्य समुह प्रशासक सौ. माधुरी खांडेकर ह्यांनी केले.विदेशातील व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील ज्या कवी / कवयित्री यांना समूहात सामील व्हायचे आहे त्यांनी जन संपर्क अधिकारी श्री. विलास कुलकर्णी यांच्याशी मोबाईल क्रमांक 7506848664 या नंबर वर संपर्क साधावा
विलास कुलकर्णी
जन संपर्क अधिकारी
जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच व्हॉट्सॲप समूह