You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागण्यासाठी देण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक दोन कचराकुंड्या आणि प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद होण्याच्या हेतूने एक कापडी व एक नायलॉन पिशवीचे वाटप प्रातिनिधीक स्वरुपात १५ ऑगस्ट रोजी स्वच्छता मित्रांना करुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, विधाता सावंत, कृपा गिरप, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, पूनम जाधव आदी उपस्थित होते. वेंगुर्ला शहराचे नाव देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरही घेतले जावे अशी अपेक्षा मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा