स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवशंभु संघटना सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने कवठणी,सातार्डा ग्रामपंचायत,पोलीस दूरक्षेत्र सातार्डा, डॉक्टर सातार्डा या सर्वांना त्यांनी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता केलेल्या कामगिरीबद्दल कोरोना योद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष गजानन सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, संपर्कप्रमुख उमेश मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यामेश्वर कवठणकर, तालुका सचिव नारायण हळदणकर प्रसिद्धीप्रमुख व्यंकटेश सावंत, सदस्य सुधा कवठणकर, विजय कवठणकर,राजन हळदणकर, शिवकन्या मिथिका नारायण हळदणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.