You are currently viewing कणकवली तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

कणकवली तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

सभापती मनोज रावराणे यांच्या बांधकाम विभागास सूचना

कणकवली

कणकवलीत तालुक्यात जुलै महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते खड्डेमय झाले आहेत. पण सध्या आता पाऊस कमी असल्याने हे खड्डे लवकारत लवकर बुजवण्यात येऊन रस्ते वाहतुकीस सुरळीत करावेत यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा कणकवली तालुक्यात झाला त्यामुळे सर्व प्रमुख रस्ते हे पावसाळ्यात खड्डेमय झाले आहेत. त्यात फोंडा- वैभववाडी ,कासार्डे , नांदगाव, तसेच फोंडा- कनेडी, नरडवे या विभागासह कणकवली तालुक्यातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाल्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याच्या सूचना सभापती मनोज रावराणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा