कोविडच्या काळातही ग्रामीण भागातील मुलांना, शैक्षणिक गुणवत्ता स्तरावर ठेवण्यासाठी कोलगांव केंद्राच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे . याचाच एक भाग म्हणून “क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन” या उपक्रमाअंतर्गत केंद्रस्तरावर जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता. तर मोठया गटात चार शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे परिक्षण कोलगांव हायस्कूलचे संगीत व कला शिक्षक संगीत तज्ञ श्री. आर. सी. मेस्त्री यांनी केले असून
लहान गट-
प्रथम- आंबेगांव शाळा नं.१
द्वितीय- कुणकेरी शाळा नं.२
तृतीय- कुणकेरी शाळा नं.१
उत्तेजनार्थ- आंबेगांव म्हारकाटे
कुणकेरी शाळा नं.३
मोठा गट-
प्रथम- आंबेगांव शाळा नं.१
द्वितीय- कुणकेरी शाळा नं.१
तृतीय- कोलगांव नं.२
उत्तेजनार्थ- कोलगांव नं. १
या शाळांनी उत्कृष्ट सादरीकरणातून यश मिळवले आहे. सहभागी सर्व शाळांचे, मुलांचे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख श्री. म.ल. देसाई यांनी अभिनंदन केले असून स्पर्धा प्रमुख म्हणून कुणकेरी नं .२ चे मुख्याध्यापक श्री. नागेश गावडे यांनी काम पाहिले आहे. शैक्षणिक उपक्रमांचे संयोजनामध्ये केंद्रमुख्याध्यापक रेखा पवार, विठ्ठल कदम, मिंगेल मान्येकर, अस्मिता मुननकर, पल्लवी लुथडे, प्रशांत कदम, प्रविण कुडतरकर, संत तुकाराम राणे, अनिल मुळीक इत्यादी शिक्षकांनी सहभाग घेतला होता.