You are currently viewing देवगड जामसंडे येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

देवगड जामसंडे येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

जंगलात वनात खरी संपत्ती आहे,कोकणी रानभाज्या ना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणे गरजेचे – आ.नितेश राणे

देवगड

जंगलातील रानभाज्या नैसर्गिक रित्या तयार होत असल्याने त्याच्यावर कुठलाही प्रकारचा केमिकल्स शिडकावा असत नाही त्या जंगलातच तयार होत असल्यामुळे अशा पद्धतीच्या भाज्यांमध्ये निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती ही निसर्गतः असते त्यामुळे जंगलात मिळणारी ही खरी संपत्ती आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.हे प्रदर्शन भरवणे हा खरच खूप स्तुत्य उपक्रम आहे परंतु त्यापुढे जाऊनही त्याला बाजारपेठ कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल येईल याचा विचार होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे हेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा),पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड(उमेद) यांचे संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन कै. मो.ज गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित करण्यात आला होता त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर देवगड सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर,आत्मा समितीचे अध्यक्ष महेश पाटोळे, गट विकास अधिकारी जय प्रकाश परब,तालुका कृषी अधिकारी उलपे,रानभाजी तज्ञ,संदीप राणे कणकवली हे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच देवगड भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच वेगवेगळ्या बचत गटातील महिलाही या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.

आमदार पुढे बोलताना म्हणाले की,नारायण राणे साहेबांना सुद्धा या रान भाज्यांमध्ये विशेष आवड आहे. कोणतीही संस्था मग ती पंचायत समिती असेल,कृषी व्यवस्थापन यंत्रणा असेल, कृषी विभाग असेल या संस्था अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतात हे खूपच कौतुकास्पद आहे चाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या लोकांसमोर यावेत हा हेतू स्वच्छ आणि लोकांच्या हिताचा आहे. २०२०-२१ या कोरोना महामारी च्या वर्षात कधी नव्हे ते आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलोय आज टीव्हीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधांच्या जाहिराती सातत्याने नजरेस पडतात बाजारातील प्रॉडक्ट मध्ये नक्की रोग प्रतिकार शक्ती वाढते का? हे काय आपल्या हातात नाही परंतु जंगलातील या रानभाज्या नैसर्गिक रित्या तयार होत असल्याने निश्चितच त्यात रोगप्रतिकार क्षमता खूप चांगल्या पद्धतीची असते.

रान भाज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणे गरजेचे आहे तरच त्यांचा खप होऊन विक्री वाढेल व खूप चांगला रोजगार इथल्या स्थानिक लोकांना मिळेल रानभाज्यांची मागणी मुंबई व अन्य ठिकाणी वाढू लागली आहे असाच महोत्सव जर मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये केला असता तर त्याचा खूप चांगला फायदा इथल्या लोकांना निश्चितच झाला असता व्यवसायिक दृष्टीने या गोष्टीकडे पाहणे फार गरजेचे आहे एखाद्या ॲपच्या माध्यमातून या भाज्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देता येऊ शकतात अशा पद्धतीचे प्रतिपादन रानभाज्या प्रदर्शनात आमदार नितेश राणे यांनी उपस्थितांना केले.

यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा आपापले मत व्यक्त करत रान भाज्यांचे महत्व पटवून दिले. यावेळी आत्मा कमिटी चे अध्यक्ष महेश पाटोळे म्हणाले या प्रदर्शनात 40 प्रकारच्या भाज्या आहेत यापुढेही आंबा व काजू महोत्सवाचे अशा प्रकारे आयोजन करून स्थानिक बचत गटांना या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या कमिटीच्या वतीने केले जाईल.

देवगड सभापती रवी पाळेकर म्हणाले की आपल्या आजूबाजूलाच 60 ते 70 प्रकारच्या भाज्या पावसाळ्यात होत असतात मात्र यातील ठरवीक भाज्यांचीच माहिती लोकांना असते आपल्याकडे पिकलेल्या या रानभाज्या आपल्याच लोकांना माहीत नसतात त्या माहित व्हाव्यात या हेतूने हे प्रदर्शन कित्येक वर्षांनी प्रथमच भरवण्यात आले आहे.

या रानभाजी महोत्सवात स्थानिक उपलब्ध होणाऱ्या ज्या की, पावसाळा सुरू झाल्यावर तयार होतात त्या सर्व रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.रानभाज्यांचे आहारातील महत्व त्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म यांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तसेच त्यांची पाककृती देखील पहायची संधी या रानभाजी महोत्सवात पाहायला मिळाली. ग्राम संघाच्या माध्यमातून या रानभाजी महोत्सवात कातवणेश्वर, मिठमुंबरी, वाडा, कुवळे, कट्टा, आरे, पुरळ, पडवणे, मुणगे, शिरगाव साळशी, सांडवे, कुणकेश्वर, कातवण, रहाटेश्वर आदी गावातील ग्राम संघानी सहभाग घेतला होता.

बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती या निमित्ताने उपस्थितांना पाहायला मिळाल्या. व त्याची चवही चाखता आली.रानभाजी विषयक सविस्तर माहिती देण्याकरिता श्री. संदीप राणे रानभाजी तज्ञ उपस्थित होते त्यांच्या कडून उपस्थितांना रानभाज्यांबद्धलचे सविस्तर ज्ञान मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा