You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जवानांना पाठविल्या राख्या व शुभेच्छा पत्रे

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जवानांना पाठविल्या राख्या व शुभेच्छा पत्रे

बांदा

एक राखी सैनिकासाठी, सीमेवरच्या भावासाठी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १च्या स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी घरीच स्वनिर्मित राख्या तयार करून भारतमातेची सेवा बजावत असलेल्या जवानांना टपालद्वारे २२१ राख्या पाठवल्या.
बहीण भावाचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला राख्यांचे अनन्यसाधारण महत्त असते. देशसेवेसाठी तैनात असलेल्या सैनिकांना या पवित्र सणाला आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला येणे शक्य होत नाही.सैन्यातील भावांचा या दिवशी उत्साह वाढावा आणि बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा यासाठी बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित बनवलेल्या राख्या व शुभेच्छाकार्ड पोस्टाद्वारे रवाना केली.
प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी .पाटील हे गेली अनेक वर्ष सैनिकांना राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवित आहेत.या उपक्रमाला मुख्याध्यापक सरोज नाईक, उपशिक्षक रंगनाथ परब, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, लुईजा गोन्सलवीस , रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शातोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील, शितल गवस,  प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाला बांदा पोस्ट आॉफीस मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. शाळेत राबवलेल्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान यांनी कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − six =