भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेतर्फे १५ रोजी उपोषण
वेंगुर्ला
रेडी येथील खाण कंपनीने बेजबाबदार व मनमानीपणे तेथील शेतक-यांच्या खाजगी जमिनीत खनिजयुक्त चिखलाचे पाणी सोडल्याने ८ ते ९ एकर शेतजमीन नापिक झाली आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म निधीतन या शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी खनिकर्म विभागाने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेतर्फे १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सन २०१६ साली खाण कंपनीने बेजबाबदारपणे तेथील माडांना पूरेसा पाणी पुरवठा न केल्यामुळे व खनिजयुक्त चिखलाचे पाणी माड बागायतीत सोडल्याने कृषि विभागाच्या सर्वेक्षणानुसार सुमारे १२८३ माडाची झाडे पाण्याअभावी सूकून रेडीतील शेतक-यांचे ३८,४९,००० रुपयांचे नुकसान झाले. या संदभात रेडीतील शेतक-यांच्यावतीने भारतीय भ्रष्टाचार निवारण समितीने २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण केले असता खनिकर्म विभागाने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी तसेच शेतकरी सहलीच्या नावाखाली रेडी ग्रामपंचायतीने केलेल्या शासकीय निधीचा गैरवापर, आरवली ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून बांधण्यात आलेल्या गणेश घाटच्या कामाची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हयातील रेडी गावात खनिज उत्खननामुळे प्रभावीत झालेल्या रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास पालकमंत्री उदय सामंत यानी जिल्हा खनिकर्म निधितन मंजूर केलेल्या नविन रुग्णवाहिका तात्काळ रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात याव्यात, या व इतर मागण्यासाटी हे उपोषण करण्यात येणार आहे.