You are currently viewing डॉ. केतकी सावंत हिचे एम. डी. परीक्षेत उज्वल यश

डॉ. केतकी सावंत हिचे एम. डी. परीक्षेत उज्वल यश

प्रथम क्रमांकाने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सिंधुदुर्गनगरी :

डॉ. सौ. केतकी निनाद सावंत रा. कणकवली हिने एम. बी. बी. एस. पर्यंतचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या महाविद्यालयातुन पूर्ण केले. तद्नंतर तिने एम. डी. प्रवेश परीक्षा पहील्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे गुणवत्तेनुसार एम. डी. बालरोग (M. D. Pediatrics) ला प्रवेश मिळविला.एम. डी. बालरोगतज्ज्ञ (M. D. Pediatric) या अंतिम वर्षाच्या परीक्षेत या महाविद्यालयातुन प्रथम क्रमांकाने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. डॉ. केतकी सावंत हिने मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोगतज्ज्ञ विभागाच्या प्राध्यापकांकडून मिळालेले अचुक मार्गदर्शन व पति, सासु-सासरे, आई-वडील यांचेकडून वेळोवेळी उच्चशिक्षणाबाबत मिळालेली प्रेरणा यामुळेच मी हे यश संपादन करु शकले. त्यामुळे या यशाचे खरे श्रेय त्यांनाच मी देऊ इच्छिते असे त्या म्हणाल्या. यापुढे तिचा नवजातशास्ञ (Neonatology) या विषयात सुपर स्पेशालिटी करण्याचा मनोदय आहे. डॉ. केतकी सावंत या डॉ. निनाद सावंत न्युरोसर्जन यांच्या त्या पत्नी व सौ. अस्मिता व आनंद सावंत, माजी सरव्यवस्थापक सिंधुदुर्ग बँक यांच्या त्या सुनबाई आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा