अद्भुत नजाऱ्याने डोळ्यांचे पारणे फिटले.
अवकाशात चंद्राभोवती पडलेले खळे अथवा रिंग काहीवेळा पहायला मिळते, अलीकडेच तशी रिंग चंद्राभोवती पडलेली दिसून आली होती. परंतु सूर्याभोवती इंद्रधनुष्य रंगाची रिंग पहायला मिळणे हा दुर्मिळ योग. अशीच इंद्रधनुष्य रुपी रिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सूर्याभोवती पडलेली पहायला मिळाली. अनेकांनी अद्भुत अशा या घटनेचे साक्षीदार होताना सूर्याची अशी विलोभनीय कलाकृती देखील आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. सूर्याभोवती पडलेल्या या रिंगला इंग्रजी मध्ये हॅलो तर मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे संबोधतात.
वादळानंतर अवकाशात २० हजार फुटांवर सिरस नावाचे ढग तयार होतात ज्यात छोटे छोटे बर्फाचे क्रिस्टल असतात, या क्रिस्टल्स मधून सूर्यकिरण गेल्यावर त्याचं रिफ्लेकशन होऊन हे खळ तयार होतं. याचा रंग आतून लाल तर बाहेरून निळा असतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसणाऱ्या सूर्याभोवती पडलेल्या इंद्रधनुष्य रुपी रिंगचा अनेकांनी आनंद घेतला.