You are currently viewing आनंदीबाई राणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी व बी के एल वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन

आनंदीबाई राणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी व बी के एल वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन

वैभववाडी

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई राणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी व बी के एल वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वैभववाडी तालुका सभापती अक्षता डाफळे मॅडम,  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स अल्सर,मोतीबिंदू, मुळव्याध, मुतखडा, चरबीचे आजार, कार्डियाक, थायरॉईड, कान नाक घसा, महिलांच्या गर्भाशयाचे शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, या शिबिरामध्ये होणार आहेत. या शिबिरासाठी बी के एल वालावलकर डेरवन येथील रुग्णालयाची टीम, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथील टीम, माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांचा सक्रिय सहभाग आहे.

या उद्घाटन प्रसंगी उपस्थित वैभववाडी तालुका सभापती अक्षता डाफळे मॅडम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मे सर , महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक अध्यक्ष सज्जन काका रावराणे, संस्था सचिव प्रमोद रावराणे,कॉलेज चे प्राचार्य काकडे सर, जि. प.सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, उत्तम सुतार,मनोहर फोंडके, महेश रावराणे,किशोर दळवी,श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट व श्री माऊली क्लिनिकल लॅब चे संस्थापक अध्यक्ष नवलराज काळे,लुपिन फाऊंडेशनचे प्रवीण पेडणेकर, कॉलेज चे प्राध्यापक आरोग्य शिबिरास उपस्थित असलेले आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा