You are currently viewing कळणे बेकायदेशीर मायनिंग

कळणे बेकायदेशीर मायनिंग

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; रतनभाऊ कदम

सिंधुदुर्गनगरी :

कळणे येथील २८ जुलै २०२१ रोजी झालेल्या  भूस्खलनामुळे कळणे गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. याला जबाबदार तेथील बेकायदेशीर मायनिंग आहे. मे. मिनरल्स अँड मेटल्स व स्मरुद्धा रिसोर्स लि. या दोन कंपन्यांमार्फत कळणे येथे खनिज उत्खननाचे काम चालू आहे. या कंपन्यांना भारत सरकार व राज्य सरकारने दिलेले ठेके पूर्णपणे बेकायदेशीर व विनापरवाना आहेत, असे माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत समोर आले आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळेच कळणे वासियांना नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. या दूर्घटनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. कारण त्यांनी या बेकायदेशीर उत्खननाकडे दूर्लक्ष केले आहे. यामध्ये मायनिंगचे मालक आणि संबंधित अधिकारी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचे नाकारता येत नाही. म्हणून या संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी. अप्पर जिल्हाधिकारी, खनिकर्म कधिकारी, तहसिलदार, वनविभाग अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी सृष्टी परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा