शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पांग्रड व निरुखे गावभेट कार्यक्रमांदरम्यान दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे गावात येणारी एस.टी सुरु करणेसाठी आग्रही मागणी केली होती. बहुतेक गावांतील शेतीची कामे आटोपल्यामुळे तसेच पावसाचे प्रमाण सुद्धा काही प्रमाणात कमी झाल्यामुळे व एक महिन्यावर येवून ठेपलेला *”गणेश उत्सव”* या सर्व बाबींचा विचार करता गावातील ग्रामस्थांना तालुक्याशी जोडणे आवश्यक होते.
या सर्व बाबींचा विचार करता आज सोमवार दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेता श्री.नागेंद्र परब यांच्यासह कुडाळ तालुक्याचे शिवसेना शिष्टमंडळ कुडाळ एस.टी.डेपोचे आगार व्यवस्थापक श्री.डोंगरे यांना भेटले व त्यांनी कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वच बसफेऱ्या तातडीने सुरु करण्याची मागणी केली. त्यास अनुसरुन आगार व्यवस्थापक श्री.डोंगरे यांनी सर्व ग्रामीण भागातील बसफेऱ्या टप्प्याटप्याने सुरु करण्याचे मान्य केले व उदया मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी पांग्रड बसफेरी सुरु होत असून लगेचच तालुक्यातील बाकीच्या बसफेऱ्या सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा उपयोग न करता एस.टी च्या प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री.नागेंद्र परब यांनी केले आहे.
यावेळी कुडाळ पंचायत उपसभापती श्री. जयभारत पालव, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. अतुल बंगे, कुडाळ तालुका संघटक श्री. बबन बोभाटे, माजी जि. प. सदस्य श्री. संजय भोगटे, शहर प्रमुख श्री.संतोष शिरसाट, श्री.शेखर गवंडे, श्री. बाळू पालव,श्री.वासुदेव सडवेलकर आदि उपस्थित होते.