गणेश मूर्ती कलेचा वारसा जपतेय मार्गी कुटुंबीय
गणेश मूर्ती कलेचा वारसा जपतेय मार्गी कुटुंबीय

गणेश मूर्ती कलेचा वारसा जपतेय मार्गी कुटुंबीय

गणेश चतुर्थीला अवघे चार दिवस राहिलेत आणि गणपती मूर्तीकार यांची लगबग सध्या आपणास जोरात चाललेली त्यांची रंगकामाची घाई सर्व गणेश शाळांमधून आपणास पहावयास मिळत आहे.

असेच एक गणेश मूर्तीकार कै. बापू मार्गी यांचे नातू व सदानंद मार्गी यांचे चिरंजीव कु.दशरथ मार्गी, कु.गिरीधर मार्गी आणि कु.दयानंद मार्गी हे मार्गी बंधू एका गरीब कुटुंबातील हे कलाकार राहणार म्हापण – मळई, खवणे हे आपला मूर्तिकलेतील तिसऱ्या पिढीचा वारसा जोपासत आहेत. मूर्तिकला आणि रंगकामाचा विविध कलाविष्कार सादर करून सर्वांच्या कौतुकास पात्र ते ठरत आहेत.

या महामारी कोरोना काळातही आपल्या कलेतून लोकांचे लक्ष वेधून घेत याचा आनंद सर्वाना देत आहेत व यांना राठवळ वाडी येथील गोडे बंधू मित्रपरिवार यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभत आहे.

मूर्तीकार – दशरथ मार्गी
मो.9421004470

प्रतिक्रिया व्यक्त करा